टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे आज दि.22 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय रुग्णालयात येथे 21 जणांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली असून त्या 21 जणांची टेस्ट ‘निगेटिव्ह’ आली आहे तर 9 जणांचे स्वब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा वैदयकीय रुग्णालय यांचे मार्फत 16 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 5 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट असे एकुण मंगळवेढा येथे 21 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.22 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आहेत.त्या सर्व 21 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.
तसेच आज वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 9 जणांचे स्वब घेण्यात आलेले असुन ते सोलापूर येथे कोरोना चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविणेत आलेले आहेत.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज