टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलीस स्टेशनला गेले होते, तेथे माझी तक्रार घेतली नाही. पोलिसांनी ऐकून घेतले नाही, असे म्हणून एका तरुणीने शुक्रवारी न्यायालयाच्या प्रवेशद्वारात दुपारी १ सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी त्या तरुणीविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे.
या प्रकणी पोलीस अजित मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील पोर्चमध्ये टपाल बॉक्सजवळ एक महिला अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती मिळाली.
तत्काळ धाव घेतलीली असता तेथे एक तरुणी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन काडीपेटी ओढण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी तिच्या हातातील काडीपेटी बाजूला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी कारण विचारता एका मुलाविरुद्ध तिने मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२१ फिर्याद दिली होती. त्याला अटकही झाली. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
दि.८ मार्च २०२२ रोजी त्या मुलाने त्याच्या घरी बोलावून घेऊन शिवागाळ व मारहाण केली, म्हणून तक्रार देण्यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनला गेले मात्र तेथेही तक्रार घेतली नाही.
म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्या तरुणीने सांगितले. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सरकारतर्फे पोलीस कर्मचारी अजित दत्ता मिसाळ यांनी फिर्याद आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज