टीम मंगळवेढा टाईम्स नेटवर्क ।
मंगळवेढा पोलीस प्रशासन व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मंगळवेढा येथील रजपूत मंगल कार्यालय येथे रोजगार व स्वयंरोजगार सुशिक्षित बेकार तरुणांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पंढरपूर रोड वरील रजपूत मंगल कार्यालय येथे आज दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे
यामध्ये हाऊसकोल्ड वायरिंग व सोलर इन्स्टॉलेशन, टू व्हिलर, फोर व्हिलर, सर्व्हिस टेक्नीशियन मेकॅनिकल, वेल्डींग असिस्टंट, हॉटेल मॅनेजमेंट, हाऊसकिपींग व फुड अँड व्हेव्हरेजेस, प्लंबर जनरल अँड फायर सर्व्हिस इन्स्टॉलेशन, हेल्थकेअर असिस्टंट,
मेसन अँड टाईल्स फिटींग, ड्रायवॉल फॉल्स सिलींग अँड पेंटींग आदी कोर्सची माहिती बेरोजगारांना देण्यात येणार आहे.
यावेळी अभय गायकवाड हे बेरोजगारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शेतकऱ्यासाठी सेंद्रीय शेती व जागरुकता या विषयावरही व्याख्यान होणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व बेरोजगार युवकांनी या मेळाव्याचा लाभघ्यावा असे आवाहन ट्रॅफिक विभागाचे प्रमुख संभाजी यादव व गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, दहावी पास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, चार आय कार्ड साईज फोटो (सर्व कागदपत्रांचे ३ झेरॉक्स प्रती)
संस्थेची वैशिष्ट्ये •
संपूर्ण प्रशिक्षण मोफत, निवासाची उत्तम सोय, मोफत चहा, नाश्ता व भोजन, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे शासनमान्य प्रमाणपत्र व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क करा
पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी यादव ९९२२४१३९८६, दिगंबर गेजगे ९६२३४८७४८७, बापूसाहेब ठोकळे ९४२१०४१४३३ व अतुल मोरे ९९६०५४६६७२ यांच्याशी संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज