टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचा जिल्हा पदाधिकारी असलेला विवेक खिलारे याने मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत गावातील सोशल मीडिया ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकून सामाजिक सलोखा बिघडवून तेढ निर्माण करणारे कृत्य केले असून खिलारे वर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिले.
शनिवारी रात्री खिलारे याने डोंगरगाव येथील व्हाटसप ग्रुप वर मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला आरक्षण मागणीशी संबधीत अर्वाच्य भाषे सह काही प्राण्यांच्या नावाने वादग्रस्त टिपण्णी व काही फोटो पोस्ट केली होती.
यावर त्या ग्रुपवर असलेल्या नागरिकांनी हे चुकीचे असून या पोस्ट डिलीट करून टाकाव्या अशी सूचना सांगितल्या नंतर ही त्याने आपली अरेरावी सुरू ठेवली तुम्ही यावर माझा निषेध करा मी माझे काम करणारच असा पवित्रा घेतला
यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्यासाठी भाजप कडून हा डाव खेळला जात आहे का असा सवाल मराठा समाजातून उपस्थित केला जात आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण सगेसोयरे अंमलबजावणी मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यात सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्याचे निश्चित झाले होते.
या बैठकीत डोंगरगाव येथील सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील काही समाजाचे बांधव डोंगरगाव या ठिकाणी पोहोचले यानंतर खिलारे याला याबाबत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मात्र खिलारे हा संपर्कात आला नाही त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित माने हे डोंगरगांव येथे घटनास्थळी पोहोचले व शांतता अबाधित केली दरम्यान त्याची पत्नी गावची सरपंच असून या अगोदर ही त्याच्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता व कारवाई होत नाही याबाबत भाळवणी येथील शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात येताच भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागून माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य झाले होते यापुढे असे घडणार नाही असे सांगितले.
मंगळवेढा येथील, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप चंद्रशेखर कोंडूभैरी, माजी नगरसेवक राहुल सावंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष विनायक कलुबर्मे, राहुल वाकडे, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, संभाजी घुले,
वारी परिवाराचे प्रमुख सतीश दत्तू, क्रांती दत्तू, प्रफुल्ल सोमदळे, दत्तात्रय भोसले, नारायण गोवे, अँड राहुल घुले, आनंद मुढे, नागेश भगरे, विजय कोंडुभैरी, विजय हजारे, क्रांती दत्तू, डोंगरगाव येथील भारत हेंबाडे, ज्योतीराम जाधव, तानाजी मोरे, मदन पाटील,
संतोष मोरे, सागर कवाळे, बालाजी लटके, पांडुरंग हेंबाडे, सार्थक भोसले, तुषार भुसे, पांडुरंग लटके, आबासाहेब हेंबाडे, विश्वंभर मोरे, अण्णासो हेंबाडे, मधुकर मोरे यांच्यासह मराठा समाजातील विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज