टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिपर व टमटम या वाहनावर कारवाई न करता आर्थिक तडजोडीतून सोडून दिल्याप्रकरणी
मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस हवालदार अर्जुन मुळे यांच्यावर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
सांगोला येथील आलेले माण नदीपात्रातून बेकायदा वाळू घेऊन आलेले टिपर व टमटम ही दोन वाहने दि. ७ रोजी रात्री २.४० च्या दरम्यान
लक्ष्मीदहिवडी ते सावे गावाकडे जाणाऱ्या गौरी जलधाराच्या समोर पोलिसांनी पकडलेली होती.
सदर वाहनावर पोलीस हवालदार अर्जुन मुळे यांनी कायदेशीर कारवाई न करता ती वाहने आर्थिक तडजोडीतून सोडून दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त होताच
त्यांनी सखोल चौकशी करून त्यानी पोलीस हवालदार अर्जुन मुळे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाचा आदेश काढला आहे.
हवालदार अर्जुन मुळे यांना निलंबित केल्याचा आदेश प्राप्त
टिपर व टमटम अशा दोन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करता ती परस्पर सोडून दिल्याने हवालदार अर्जुन मुळे यांना निलंबित केल्याचा आदेश प्राप्त झाला आहे.- राजश्री पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा .
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज