समाधान फुगारे । मंगळवेढा शहरालगत असलेल्या दामाजी नगर येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी गेला आहे.तर आज दिवसभरात तब्बल 35 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आज 382 वर पोहोचली आहे.तालुक्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दि.20 ऑगस्ट रोजी 60 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 28 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 28 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 2 आणि निगेटिव्ह -26 आलेले आहेत.
सदर नागरिक हे बारोळे 1 , नंदेश्वर 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत. तर सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 33 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
सदर नागरिक हे चोखामेळानगर 8 , डिकसळ 1 , जित्ती 1 , डोणज 1 , नंदुर 1 , हाजापुर 1 , लक्ष्मीदहीवडी -20 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 382
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 203 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज 8 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज