टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवदास विश्वनाथ चिंचकर यांचे मंगळवार दि.५ आक्टोबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना , जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तेलाचे व्यापारी राजेंद्र चिंचकर, अनिल चिंचकर यांचे वडील तर रतनचंद शहा सहकारी बँकेचे कर्मचारी पप्पू चिंचकर यांचे ते आजोबा होत.
शिवदास चिंचकर यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि. ६ आक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. राहते घरापासून निघणार आहे.
दरम्यान मंगळवारी त्यांचा ९४ वा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसादिवशीच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज