mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! 23 गावच्या निवडी पार पडल्या; गावनिहाय सरपंच,उपसरंपच नावे पाहा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 12, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्‍यातील 23 गावच्या सरपंच निवडी आज पार पडल्या.निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घातलेले हुलजंतीत निवडीच्या वेळी मात्र परस्परविरोधी उभारले गेले तर नंदेश्नरात एकमेकाच्या विरोधात लढलेले सरपंच पदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा पडून गावच्या सत्तेची सूत्रे हातात घेतली.

आज 23 गावच्या सरपंच पदाची निवडणूक अध्यासी अधिकारीकडून 23 गावातील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

नंदेश्वर येथे एकमेकाच्या विरोधात लढलेले गरंडे व ढोलतडे सरपंच व उपसरपंच पद वाटणी करून एकत्र आले. हुलजंती येथे एकाच पॅनलचे उमेदवार एकमेकाच्या विरोधात सरपंच पदासाठी मीनाक्षी कुरमत्ते यांना आव्हान दिले तर उपसरपंच बाळासाहेब माळी बिनविरोध झाले.

मरवडे येथे नामदेव गायकवाड, लतिफ तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, संदीप सूर्यवंशी, श्रीकांत गणपाटील यांनी स्थापन केलेल्या गाव विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले.

महमदाबाद शेटफळ येथे समविचारी तरुणांनी गाव गाडा ताब्यात घेतला. भोसे येथे अवताडे गटाचे उपसभापती सुरेश ढोणे यांच्या पत्नीला सरपंचपद मिळाले तर उपसरपंचपद भालके गटाला मिळाले.

कचरेवाडी येथे अवताडे गटाला सत्ता मिळूनही सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाले. गणेशवाडी येथे राखीव जागेचा उमेदवार नसल्यामुळे ते पद रिक्त राहिले. उपसरपंच म्हणून दिपाली तानगावडे यांची निवड झाली.
बोराळे येथे स्थानिक एकत्र येत केलेल्या आघाडीला सत्ता मिळाली सरपंच व उपसरपंच पद दोन्हीही बिनविरोध झाले तर डोणज येथे समसमान सदस्य विजयी झाले.

बिनविरोध सदस्यांने अवताडे गटात कौल दिल्यामुळे अवताडे गटाला सरपंच पद मिळाले तर बिनरोध सदस्य सिद्धाराम कोळी याला उपसरपंच पद मिळाले.

कर्जाळ कात्राळ येथे दामाजी संचालक विजय माने यांच्या पत्नी सरपंच पदी विराजमान झाल्या. बिनविरोध निवडणूक झालेल्या मुढवी येथे महावीर ठेंगील हे सरपंच व मंदाकिनी रोकडे बिनरोध निवडले.

सिद्धापूर येथे परिचारक गटाने भालके गटांच्या मदतीने सत्ता मिळवली मल्लेवाडी येथे अवताडे भालके समर्थकांनी सत्ता मिळवली दुपारी दोन वाजता निवडी जाहीर झाल्यानंतर विजयी सरपंच उपसरपंच त्याच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके आतिषबाजी करून सत्कार केले.

काही गावच्या सरपंच व त्यांच्या उपसरपंच यांची संपर्क साधून गटाविषयी विचारणा केली असता तालुक्यातील सर्वच नेत्यावर हात ठेवत आम्ही सगळ्यांच असल्याचा दावा करत गाव विकास आघाडीचा दावा केला आहे.

मात्र यापुढील काळात होणाऱ्या सहकारी संस्था व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा दावा फोल ठरेल याची शक्‍यता नाकारता येत नाही त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.(sakal)

सरपंच व उपसरपंच नावे पुढीलप्रमाणे :-

नंदेश्वर : सजाबाई गरंडे,आनंदा पाटील ,

मरवडे : सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी

बालाजीनगर : अंजना राठोड अश्विनी राठोड,

लवंगी : अलका देवकर, सदाशिव लेंगरे,

डोणज : किर्ती केदार, सदाशिव कोळी,

बोराळे : सुजाता पाटील, संतोष गणेशकर

लेंडवेचिंचाळे : नंदा इंगोले,द्वारकाबाई लोखंडे ,

सलगर बुद्रुक : शशिकला टिक्के, श्रीमंत सवाईसर्जे,

माचणूर : पल्लवी डोके, उमेश डोके,

तामदर्डी : रेखा शिंदे, बळीराम शिनगारे,

घरनिकी : सुनिता रणदिवे, बापू भुसे ,

ADVERTISEMENT

भोसे : सुनिता ढोणे, श्‍यामल काकडे,

कचरेवाडी : संगीता काळुंगे,संपदा इंगोले,

तांडोर : कविता मळगे,रोशन शेख,

कर्जाळ/कात्राळ : वैष्णवी माने, सुनंदा बंडगर,

मुढवी : महावीर ठेंगील, मंदाकिनी रोकडे ,

सिध्दापूर : लक्ष्मीबाई नांगरे, भिमराया सिंदखेड,

महमदाबाद शे: -सरीता सुडके, संतोष सोनवणे,

आसबेवाडी : स्वाती आसबे, शोभा खताळ,

अरळी : मल्लिकार्जुन भांजे, हेमंत तोरणे

मल्लेवाडीः दिपाली गोडसे, अजित माळी

गणेशवाडी : दीपाली तानगावडे,

हुलजंती : मीनाक्षी करमुत्ते, बाळासाहेब माळी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासरपंच निवड
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

मंगळवेढेकरांनो! RX100 हेअर सलून आजपासून आपल्या सेवेत; प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात; सर्व सुविधा एकाच छताखाली

March 21, 2023
श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक ‘या’ योजनांचा लाभ घ्या

श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक ‘या’ योजनांचा लाभ घ्या

March 21, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
कौतुकास्पद! शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी परिचारक कुटुंबियाकडून ३ लाखाची देणगी

कौतुकास्पद! शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी परिचारक कुटुंबियाकडून ३ लाखाची देणगी

March 21, 2023
गुढीपाडवा ऑफर! मोबाइल, टीव्ही, वॉशिंग मशीन, AC, फ्रीज 1 खरेदी पे 3 ऑफर; 1 ते 3 हजारपर्यंत हमखास कॅश बॅक; 1 ते 3 हजारांचे गिफ्ट; सोबत 30 टक्केपर्यंत फिक्स डिस्काउंट; फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपीमध्ये

Next Post

सांगोल्यात नागेश फोटोवाला लॅबचे आज उदघाटन; अभिनेत्री माधुरी पवार यांचे खास आकर्षण

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..