समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा येथे पुण्याहून आलेल्या त्या महिलेसह आठ जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते त्या आठ जणांचे रिपोर्ट आज प्रशासनास मिळाले असून ते नेगिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील रुक्मिणी माता वसतिगृह या संस्थात्मक विलीगीकरण केंद्रातील आठ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले होते हे सर्व नमुने करोना चाचणीसाठी निगेटिव्ह आलेले आहेत.
त्यामुळे या व्यक्ती व त्या अनुषंगाने संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवलेल्या इतर 11 व्यक्ती यांना शासन धोरणानुसार त्यांच्या घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात येणार असून पुढील विहित कालावधीसाठी त्यांच्यावर आवश्यक ती वैद्यकीय निगराणी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही प्रांताधिकारी भोसले यांनी दिली आहे.
—————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज