टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून तालुक्यातील ब्रम्हपुरी व नंदेश्वर या गावातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 29 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 273 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 28 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.7 ऑक्टोबर रोजी नागरिकांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज 164 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 164 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 13 आणि निगेटिव्ह 151 जणांचे अहवाल आलेले आहेत . सदरचे नागरिक हे मंगळवेढा 11 , कचरेवाडी 1 आणि शेलेवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा 1 , नंदेश्वर 2 येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 273 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 129 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Corona killed two on the same day in Mangalwedha taluka; Today, 20 people are free from corona
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज