टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथून एक २२ वर्षीय महाविदयालयीन तरूणी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या भावाने मंगळवेढा पोलिसात नोंदविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर तरूणीचे शिक्षण टी.वाय.बी.कॉम पूर्ण झाले असून ती आता घरीच असते.१५ डिसेंबर रोजी रात्रौ १०.३० ते १६ डिसेंबर रोजी पहाटे १.०० च्या दरम्यान ती रहाते घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली ती अदयापपर्यंत घरी आली नाही.
सदर तरूणी अंगाने मध्यम असून रंग गोरा , चेहरा उभट, नाक सरळ, डोळे खोलगट , उंची ५ फुट , केस काळे, अंगात काळी पँट व पांढरा टी शर्ट असून तीला मराठी व हिंदी बोलता येते.
सदर वर्णनाची तरूणी कोणास आढळल्यास त्यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन मंगळवेढा पोलिसांनी केले आहे.
चोरून वाळू वाहतूक दोघांविरूध्द गुन्हा
माण नदीच्या पात्रातून विना परवाना चोरून वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नितीन धनवडे व विजय जावळे यांचेविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेंपोचालक नितीन संजय धनवडे व मालक विजय जावळे यांनी संगनमत करून दि.१७ डिसेंबर रोजी माण नदीपात्रातून विना परवाना चोरून वाळू वाहतूक करीत असताना दुपारी २.३० च्या सुमारास ते कारखाना चौक मंगळवेढा येथे बिगर नंबरच्या वाळूने भरलेल्या ४०७ टेंपोसह मिळून आले.
याची फिर्याद पो.कॉ.राजू आवटे यांनी दिली . पोलिसांनी अंदाजे एक ब्रास वाळू , टेंपो असा एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्या दोघांविरूध्द भा.दं.वि.सं. कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोळी हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज