टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह लावल्याप्रकरणी दत्तात्रय हरीबा इंगोले,कविता दत्तात्रय इंगोले,जालिंदर भोसले,किसनाबाई भोसले (रा.खुपसंगी) या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील अल्पवयीन मुलगी ही गणेशवाडी येथील ती अल्पवयीन आहे हे माहित असतानासुध्दा आरोपी तथा वडील दत्तात्रय इंगोले,आई कविता इंगोले व नातेवाईक जालिंदर भोसले आदीनी दि. 4 रोजी 12.45 च्या दरम्यान जालिंदर भोसले यांचे खुपसंगी येथील राहते घरासमोर बालविवाह लावल्याची,
फिर्याद पोलिस नाईक अमर सुरवसे यांनी दाखल केल्यावर वरील चौघा आरोपीविरूध्द बालविवाह प्रतिबंधक कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलिस नाईक दत्तात्रय येलपले हे करीत आहेत.
Mangalwedha Charges filed against four in child marriage case
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज