टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या दहा दिवसापासून बंद असलेले मंगळवेढा शहर (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) उद्या मंगळवार पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
1 दत्तू-गुंगे गल्ली – चांभार गल्ली,सुतार गल्ली, कुंभार गल्ली व खंडोबा गल्ली.
2 नागणेवाडी – नागणेवाडी झोपडपटटी (पूर्वेकडील व दक्षिणेकडील ) ,शिवाजी नगर (दामाजीनगर ग्रामपंचायत) व दामाजीनगर ग्रामपंचायत.
3 वडर गल्ली – माळी गल्ली,बेरड गल्ली, सांगोला नाका ते माळी गल्ली व शिवाजी तालीम ते माळी गल्ली.
4 रजपूतवाडा व सब जेल (किल्ला भाग) – जुनी बँक ऑफ इंडिया शाखा ते मुदगुल दुकान ते तालुका आरोग्य कार्यालय, बीएसएनएल ऑफिस ते बक्षी वाडयापासून दिवसे घर ते लाळे कलेक्शन पर्यंत,लाळे कलेक्शन ते जुनी बंक ऑफ इंडिया व तालुका आरोग्य कार्यालय ते बीएसएनएल पर्यंतचा हा भाग व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून आज दि.20 जुलै ते दि.26 जुलै रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत असा 7 दिवसांसाठी हा भाग बंद राहणार आहे.
मंगळवेढा शहरातील नगरपरिषद हद्द परीसर मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती श्री.संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्द परीसर व श्री.संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राचा इकडील कार्यालयीन आदेश दि.10 जुलै रोजीचा आदेश रदद केलेला आहे.
या भागामध्ये जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार विहीत केलेल्या वेळेत (सकाळी 9 ते सायंकाळी 5) , शासकीय अटी व शर्तीचे पालन करून नियमित व्यवहार करणेस परवानगी देणेत आली आहे.
सदर शिथिल प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा अंमल आज दि.20 जुलै रोजी रात्री 12 नंतर वरील नमुद परिसर वगळून राहील.
मंगळवेढा तालुका वैदयकीय रुग्णालय यांच्या मार्फत मंगळवेढा येथे 10 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.20 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व 10 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे हे गांव प्रतिबंधित क्षेत्र दि.8 जुलै रोजीचे आदेशान्वये म्हणून घोषित करणेत आले होते. बोराळे संपुर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश रदद करणेत आलेला आहे. सदर शिथिल प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा अंमलबजावणी आज दि.20 रोजी रात्री 12 नंतर राहील.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले
मंगळवेढा शहारामधील सर्व व्यावसायिकांना व नागरिकांना स्वतःची काळजी घेऊन शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार दुकाने उघडायची आहेत. दुकानदाराने मास्क वापराने बंधनकारक आहे. दुकानामध्ये जास्तीत जास्त स्वतःला धरून 5 पेक्षा जास्त कामगार ठेवायची नाहीत. सुरक्षित अंतर राहील व दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची आहे, सॅनीटाॅझरचा वापर करणे व दुकानामध्ये ग्राहक कोण कोण आले याच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, विनाकारण मार्केट मध्ये फिरू नये, मास्क वापरावा, शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा होणार्या कारवाईस सामोरे जावे लागेल. कर निरीक्षक विनायक साळुंखे नगर परिषद मंगळवेढा.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज