टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ व्हावा ही मंगळवेढेकरांची इच्छा पूर्ण होणार असून मंगळवेढा शहरामध्ये शिवप्रेमी चौक येथे नगरपरिषदेच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यात येणार आहे.
यासाठी उद्या शनिवार दि.११ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे आगमन दुपारी २ वाजता मंगळवेढा शहरात होणार आहे.
मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकासह जिल्ह्यातील नागरिकांनी महाराजांच्या पुतळ्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी दिली त्यामुळे पुतळ्यास मुर्त स्वरूप आले असून मंगळवेढाकरांसाठी आनंदाचा सोहळा साजरा होणार आहे.
तरी या सोहळ्यासाठी उद्या शनिवारी दि.११ फेब्रुवारी रोजी दु.२ वा खटावकर मार्ट समोर सर्व शिवभक्तांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पुतळा समिती अध्यक्ष अजित जगताप,
सचिव राहुल सावंजी व सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष संभाजी घुले, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे, अनिल मुदगुल यांच्या वतीने करण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज