टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले होते. जिल्हा परिषद निवडणूक साठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे.
या आरक्षण सोडतील अनेक नेत्यांना धक्के बसले आहेत तर अनेक इच्छुक नेत्यांचे मार्ग आता मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड, कन्याकुमारी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत पार पडली.
एकमेव अनुसूचित जमातीचे आरक्षण हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या गटासाठी पडले आहे. मात्र ही जागा महिलेसाठी राखीव करण्यात आली आहे.
अनुसूचित जमातीनंतर अनुसूचित जातीच्या 12 जागेचे आरक्षण काढण्यात आले त्यानंतर 20 ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण झाले शेवटी सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यात सातच्या सात जिल्हा परिषदेच्या जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
प्रणिती नामदेव गायकवाड या चिमुकलीच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. तालुका निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण
1) संत दामाजी नगर गट – SC महिला
2) हूलजंती गट – OBC – ओपन
3) संत चोखामेळा नगर गट – SC महिला
4) नंदेश्वर गट – ओपन महिला
5) भोसे गट – ओपन
मंगळवेढा पंचायत समिती गण आरक्षण पुढील प्रमाणे;-
दामाजीनगर गट
1) दामाजीनगर -सर्वसाधारण
2) बोराळे -सर्वसाधारण
हुलजंती गट
3) मरवडे- अनुसूचित जाती
4) हुलजंती-अनुसूचित जाती स्त्री
चोखामेळानगर गट
5) निंबोणी-सर्वसाधारण स्त्री
6) चोखामेळानगर-ओबीसी स्त्री
नंदेश्वर गट
7) नंदेश्वर – ओबीसी
8) लक्ष्मी दहिवडी-सर्वसाधारण स्त्री
भोसे गट
9) रड्डे-सर्वसाधारण स्त्री
10) भोसे-सर्वसाधारण
मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आता त्यांना अधिक जोमाने काम करावे लागणार असून त्यांच्या विरोधात समविचारी आघाडी तेवढ्याच ताकतीने याही निवडणुकीत उतरणार असल्याचे दिसत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज