टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा वेधचा 10 वा वर्धापन दिन सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या गुणीजनांचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा जोगेश्वरी मंगलकार्यालय बायपास रोड,मंगळवेढा येथे होणार असल्याची माहिती संपादक शिवाजी केंगार यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील शासकीय सेवेतील, कर्मचारी, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी तसेच आदर्श समाजसेवक, आदर्श सरपंच, आदर्श सहकार क्षेत्र, आदर्श राजकीय क्षेत्र, आदर्श पत्रकार यासह शेती,उद्योग व्यवसाय,दुध उत्पादक आदी क्षेत्रातील प्रेरणादायी युवकांचा सन्मान सोहळा होणार आहे.
वर्धापन सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, आमदार समाधान आवताडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,
सिताराम साखर कारखान्याचे-चेअरमन शिवाजीराव काळुंगे,युटोपीयन शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, सौ.प्रणिता भालके,राष्ट्रवादीचे नेते लतिफभाई तांबोळी,
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात,भटक्या विमुक्त जाती जमातीचे राष्ट्रीय नेते मच्छिंद्र भोसले, उद्योजक हनुमंतराव दुधाळ, दामाजीचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,शिक्षक समितीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश पवार,
दै.पंतनगरी वृत्त समूहाचे संस्थापक रजाकभाई मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे,पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार,जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी,पत्रकार संघाचे अध्यक्ष भिमराव मोरे, अशोकराव चेळेकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे असणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी
जिवनगौरव-भैरू वाघोबा गोडसे, जनमित्र-समाधान फुगारे, समाजरत्न-अॅड.किरण जावीर,आदर्श सरपंच- मायाक्का गुलाब थोरबाले,कृषीनिष्ठ- हरीभाऊ जाधव,आरोग्यरत्न -डॉ.पुष्पांजली नंदकुमार शिंदे,आदर्श पोलिस अधिकारी- बापूसाहेब पिंगळे,आदर्श शिक्षक-मारूती फराटे,
आदर्श ग्रामसेवक-राखी सुनिल जाधव,आदर्श चेअरमन-तृप्ती लक्ष्मण शिंदे,आदर्श पशुधन विकास अधिकारी- विठ्ठल खटकाळे,आदर्श आरोग्य सेवक-सुनिल जाधव ,आदर्श पशुधन पर्यवेक्षक- डॉ.महेश जाधव,उत्कृष्ट सामाजिक सेवा-श्री.विष्णू सानेपागुल,आदर्श पत्रकार हुकूम मुलाणी,
आदर्श समाजसेवा-अमोल माने,पशुमित्र- महेश घुले, कृषी युवा उद्योजक- अमृत लेंडवे, दिव्यांगरत्न- समाधान हेंबाडे, बेस्ट निवेदक -संतोष मिसाळ,आदर्श सामाजिक संस्था-ग्राममंगल प्रतिष्ठान,नंदूर.यांना प्रदान करण्यात येणार आहे. मंगळवेढा तालुक्यात सलग 10 वर्षे सा.मंगळवेढा वेध वृत्तपत्र अखंडितपणे सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज