टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे ५० हजार रुपये किंमतीची घरासमोर एका जि.प.शिक्षकाने लावलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल चोरट्याने पळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी शिवाजी गणपाटील (रा.मरवडे) हे हुलजंती येथे जि.प.शाळेवर शिक्षक असून दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता फटेवाडी शिवारातील
शेतात घरासमोर एम.एच.१३-ए-९६८९ ही ५० हजार रुपये किंमतीची मोटर सायकल हँडल लॉक करुन ते सोलापूरला गेले होते.
दि.२ रोजी दुपारी दोन वाजता सदर ठिकाणी आल्यावर घरासमोर लावलेली मोटर सायकल दिसून आली नाही. याबाबत त्यांनी पत्नीस मोटर सायकल कोणास दिली आहे का? असे विचारले असता कोणास दिली नसल्याचे उत्तर दिले.
मोटर सायकलचा आजूबाजूला परिसरात नातेवाईकाकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. त्यामुळे चोरट्याने मोटर सायकल चोरुन नेल्याची खात्री पटल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज