टीम मंगळवेढा टाईम्स ।
पैसे आणि सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आम्हाला मुलगाच हवा होता, तू मुलीला जन्म दिलास” असे म्हणून वारंवार अपमानित करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने आपल्या जबानीत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरी निवांत नरळे (वय २५, रा. निंबोणी, ता. मंगळवेढा) यांचा विवाह नोव्हेंबर २०१९ मध्ये निवांत बाळू नरळे (रा. बावची, ता. मंगलवेढा) यांच्याशी झाला होता.

लग्नावेळी गौरी यांच्या वडिलांनी अडीच तोळे सोने आणि ४१ हजार रुपयांचा चेक दिला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच पती निवांत याने दुचाकी घेण्यासाठी आणि कल्याण येथे भाड्याने घर घेण्यासाठी वडिलांकडून ४ लाख ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला.

मुलीच्या जन्मानंतर छळात वाढ
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, २०२३ मध्ये गौरी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

मात्र, ‘आम्हाला मुलगाच हवा होता’ असे म्हणून सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ अधिकच वाढवला. त्यांना आणि त्यांच्या लहान मुलीला ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून हिणवण्यात आले, तसेच उपाशी ठेवून मारहाण करण्यात आली.
दारूच्या नशेत मारहाण
काही काळ समझोता झाल्यानंतर गौरी पुन्हा पतीसोबत राहण्यास गेल्या होत्या, मात्र पतीच्या वागण्यात बदल झाला नाही. पती निवांत हा वारंवार दारू पिऊन येऊन पैशांच्या मागणीसाठी मारहाण आणि शिवीगाळ करत होता. या जाचाला कंटाळून अखेर गौरी यांनी आपल्या माहेरी निंबोणी येथे धाव घेतली आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
१. निवांत बाळू नरळे (पती)
२. बाळू श्रीमंत नरळे (सासरा)
३. जानाबाई बाळू नरळे (सासू)
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











