टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढत आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मानणारा हा मतदारसंघ असून जनतेनेही वेळोवेळी दाखवून दिले आहे. पूर्वीपासूनच जो उमेदवार शरद पवार देतील (2021 ची पोटनिवडणूक वगळता) तोच उमेदवार या मतदारसंघातील जनतेने निवडून दिला आहे हे आजपर्यंतचा इतिहास आहे.
2009 साली दिगवंत आमदार भारत भालके यांनी रिडॉलॉस कडून निवडणूक लढवून पहिल्यांदा विजयी झाले त्यांनी काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला. 2014 साली काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विजयी झाले. याच दरम्यान 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता.
यासाठी स्व.भारत भालके यांनी सोर्वोतोपरी प्रयत्न देखील करून अंतिम टप्प्यात राज्यपालांची मान्यता ही मिळवली होती. त्याच जोरावर 2019 साली ते राष्ट्रवादीकडून तिसऱ्यांदा आमदार झाले होते.
स्व.भारतनाना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पराभवा नंतर भगीरथ भालके हे जनतेपासून दुरावले गेले होते.
अनिल सावंत यांच्यावरती शरद पवार यांनी दिली मोठी जबाबदारी
आता अनिल सावंत यांच्यावरती शरद पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. अनिल सावंत हे जनतेमधील नेतृत्व असल्याचे बोलले जात आहे.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम
भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले. सामाजिक कार्यात ही अग्रेसर असणारे अनिल सावंत यांचे ग्रामीण भागात मोठी कार्यकर्त्याची फळी आहे.
मतदारसंघात शरद पवार यांची क्रेज
पूर्वीपासूनच हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणारा असल्यामुळे अजूनही त्यांची क्रेज प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनिल सावंत यांना ही निवडणूक जास्त अवघड जाणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसरीकडे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात जी विकास कामे केली आहेत त्याच जोरावर ते पुन्हा जनतेला सामोरे जाणार आहेत. तर मनसेचे दिलीप धोत्रे यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्येक ग्रामीण भागात होम टू होम प्रचार सुरू केला आहे.
जरांगे-पाटील यांचा फटका भाजपला होण्याची दाट शक्यता
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांचा फटका भाजपला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज भाजपावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज