मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची महाबळेश्वर नगरपरिषदेत बदली करण्यात आली असून त्या आता महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही ठिकाणचा पदभार स्विकारणार आहेत.
सांगोला तालुक्यातील असलेल्या पल्लवी पाटील या सन 5 डिसेंबर 2018 मध्ये मंगळवेढा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. रूजू झाल्यानंतर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये चांगली कामगिरी करून मंगळवेढा नगरपरिषद राज्यात अव्वल आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच रूजू झाल्यानंतर अतिक्रमणधारकावर त्यांनी कारवाईचा बडगा उचलल्याने त्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या होत्या.
लॉकडाऊनमध्ये त्यांनी पुढाकार घेवून नगरसेवकांच्या सहकार्याने मंगळवेढयातील गरीब व गरजू 1500 लोकांना अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप केलेले आहे. या शिवाय कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्येही त्यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केल्याने मंगळवेढयात कोरोनाचा शिरकाव अद्यापपर्यंत झालेला नाही हे विसरून चालणार नाही. एक कामसू व कामाला प्राधान्य देणार्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून आता त्यांची महाबळेश्वर येथे बदली करण्यात आली आहे.
Mangalvedha Municipal Council Chief Pallavi Patil transferred,Chief Officer Pallavi Patil has been transferred to Mahabaleshwar Municipal Council and he is now Mahabaleshwar and Pachgani
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज