मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा बस स्थानकावरून सांगोला बस मध्ये चढत असताना डॉ.स्वप्नाली किरण जगताप (वय.28) या महिलेच्या गळ्यातील 41 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरट्याने घटना घडले आहे.
दरम्यान अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बसस्थानकावरील महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनेची मालिका संपता संपेना.
या घटनेची हकीकत अशी की दिनांक 3 जानेवारी रोजी यातील फिर्यादी डॉक्टर स्वप्नाली जगताप ह्या मंगळवेढा बस स्थानकावरून सांगोल्यात जाण्यासाठी मंगळवेढा सांगोला बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिला डॉक्टरांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र फिर्यादीच्या संमती वाचून चोरून नेले फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मंगळसूत्र चोरीची घटना तीन जानेवारी रोजी घडली होती या घटनेला एकवीस दिवस उलटून गेले या चोरीत पंचवीस हजार रुपये मुद्देमाल चोरीला गेला आहे. मंगळवेढा पोलिसांना याची गंभीर वाटले नाही. महिला डॉक्टर कडून केवळ अर्ज घेऊन फिर्याद घेण्याचे टाळले होते.
महिला डॉक्टर घटना घडल्यापासून 23 जानेवारीपर्यंत मंगळवेढा पोलीस स्टेशनला चकरा मारत होत्या. पंचवीस हजार रुपये किमतीचे सोने चोरीला गेल्यानंतर फिर्याद दाखल करणे अपेक्षित असताना पोलिसांनी डॉक्टर महिलेची दिशाभूल करून अर्जावर तपास चालू आहे या नावाखाली वेळकाढूपणा चा प्रकार केला जात असल्याने ही घटना शुक्रवारी उघड झाली.
दरम्यान हा प्रकार प्रसारमाध्यमांकडे गेल्यामुळे पोलिसांना अखेर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे डॉक्टर कुटुंबीयांना देण्यात आला आहे. चोरीचा अर्ज घेतलेला पोलीस यांना कल्पना नव्हती शुक्रवारी ही बाब अधिकाऱ्यांच्या नजरेस आल्यानंतर तपास आमलदारांना बोलून गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
बस स्थानकावर महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र पाण्याची घटना आठ दिवसांच्या दरम्यान घडत असतानाही तेथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमला जात नसल्यामुळे पोलीस प्रशासन कामकाजाबाबत प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटनेतील एकही आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही.
ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची दखल नव्याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झालेले ठाणे अंमलदार फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने पिडीतांना न्याय मिळणे दुरापास्त होत आहे. म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतीराम मंजुळे यांनी लक्ष घालून ठाणे अंमलदारासस गुन्हे दाखल करून घेण्याबाबत सप्त सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज