टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC यंदाच्या विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा जाहीर केल्या आहेत. एमपीएससी राज्य सेवा पूर्वपरीक्षा येत्या 2 जानेवारी 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मेदरम्यान घेण्यात येणार आहे.
या परीक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच 2022 ची राज्य सेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 2021 वर्षाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी असेल.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा 16 एप्रिल 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 3 जुलैला होणार आहे,
तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 26 फेब्रुवारी 2022 तर मुख्य परीक्षा 9 जुलै ते 31 जुलैदरम्यान पार पडणार आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा 12 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा 2 जुलैला पार पडणार आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 3 एप्रिल तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान तसेच महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल आणि मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
वर्ष 2022 साठी होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा 19 जूनला तर मुख्य परीक्षा 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.
या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक एमपीएससीच्या https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध असून आयत्या वेळी परीक्षेच्या तारखांत होणाऱ्या बदलांविषयी वेबसाईटच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांना कळविण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.(स्त्रोत:सामना)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज