टीम मंगळवेढा टाईम्स।
मागील महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर हळूहळू पावसाने उघडीप घेण्यास सुरूवात केली.
मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, काही प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे.
काही कालावधीच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस भरारी घेण्याची शक्यता आहे. आता 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे.
1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसरणार आहेत.
दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होणार आहे.
पण हे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र न होता, सामान्य अवस्थेतचं पश्चिम दिशेनं पुढे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच, पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज