टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या 48 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्यानुसार, या दिवशी मतदान होईल आणि या दिवशी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. राज्यात एकूण लोकसभा जागा आहे. त्यासाठी निवडणूक होणार आहे.
7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदार संघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाहिला टप्पा 11 एप्रिलला, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, पाचवा टप्प्यात 20 मे रोजी मतदान होईल.
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी असा असेल कार्यक्रम?
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून यामध्ये काय सुरु राहणार आणि बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान सुरू होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज