टीम मंगळवेढा टाईम्स।
अत्याधुनिक आणि प्रगती बँकिंग सुविधा असलेली एल के पी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. भोसे ता.मंगळवेढा शाखेचा आज बुधवार दि.15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता लोकपर्ण सोहळा होणार असल्याची माहिती चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली आहे.
भोसे-मंगळवेढा रोड भोसे येथे ख्यातनाम व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ तर पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी काकडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
याप्रसंगी माजी गोसे गावचे सरपंच सुनीता ढोणे, मारोळीचे सरपंच राजकुमार पाटील, शिरनांदगीच्या सरपंच मायाक्का थोरबोले, हुन्नूरच्या सरपंच मनीषा खताळ, नंदेश्वर च्या सरपंच सजाबाई गरंडे, रेवेवाडी चे सरपंच ब्रह्मदेव रेवे,
मानेवाडीचे सरपंच दत्तात्रय मळगे, रेड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, निंबोणीच्या सरपंच वंदना शिंदे, चिकलगीचे सरपंच दिनेश पाटील, महमदाबादचे सरपंच यशवंत होळकर, वाणीचिंचाळे गावच्या सरपंच प्रियंका गडहिरे आदीजन मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
इथे नांदते लक्ष्मी… देते विश्वासाची हमी…. हे ब्रीद घेऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण प्रांत व शेजारील कर्नाटक राज्य असे मोठे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवत सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत घेऊन वित्तीय क्षेत्रामध्ये भरारी घेत असलेली ही संस्था आहे.
सांगोला तालुका तसेच सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, सहसंस्थापक सर्वश्री डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी या चार युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांचे जाळे उभे केलेले आहे.
सूर्योदय शूटिंग शर्टिंग, सूर्योदय वस्त्र निकेतन अँड फर्निचर मॉल, सूर्योदय मोटर्स, मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स, शॉपिंग सेंटर तसेच कृषी क्षेत्र त्याचबरोबर धवलक्रांतीसाठी देखील या उद्योग समूहाचे मोठे योगदान आहे.
सुपर सूर्योदय ॲग्रो & मिल्क इंडस्ट्रीज मेडशिंगी यासह पाच चीलिंग प्लांट च्या माध्यमातून नुकताच एक लाख लिटर प्रति दिन दूध संकलनाचा टप्पा देखील ओलांडण्यात आला आहे.
या उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.
वित्तीय क्षेत्रामध्ये या समूहाचे मोठे काम असून आजवर हजारो गरजू कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावलेला आहे. या उद्योग समूहाने सन 2022 पासून मल्टीस्टेटच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले असून एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शाखांचे जाळे उभा केले आहे.
छोट्या मोठ्या उद्योग व व्यावसायिकांकरिता ही संस्था वरदान ठरलेली असून त्वरित व सुलभ कर्ज योजना हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. ठेवीदारांसाठी देखील कितीतरी प्रकारच्या आकर्षक योजना या संस्थेच्या वतीने देऊ केलेल्या आहेत.
एल के पी दाम दुप्पट योजना, दीडपट, तिप्पट तसेच दाम चौपट योजना, एल के पी कन्यादान योजना, पेन्शन योजना अशा विविध प्रकारच्या योजनांबरोबरच अवघ्या 100 दिवसांच्या ठेवीवर देखील ही संस्था दहा टक्के इतका व्याजदर देते.
सात टक्क्यांपासून मुदतीच्या टप्प्याटप्प्याने ठेवीचे व्याजदर वाढले जात असून 24 महिन्यांच्या पुढे ही संस्था साडेबारा टक्के इतका व्याजदर देते.
ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा भगिनी, माजी सैनिक, संत महंत यांना अर्धा टक्के जादा व्याजदर असून आशांकरिता ही संस्था 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका व्याजदर देते.
व्यावसायिक व व्यापारी बांधवांसाठी आरटीजीएस, एन ई एफ टी, आय एम पी एस याबरोबरच सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा येथे मोफत उपलब्ध आहेत.
सुसज्ज फर्निचर , सेवाभावी वृत्तीचा कर्मचारी वृंद, सुमारे अठरा ते वीस वर्षापासून चा सहकाराचा अनुभव असलेले संचालक मंडळ व सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा असलेल्या या संस्थेचा लोकार्पण सोहळा येथे आज संपन्न होत असल्यामुळे भोसे व परिसरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या या लोकार्पण सोहळ्याकरिता व नामवंत वक्ते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान ऐकण्याकरिता भोसे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संचालक मंडळांनी केले आहे.
100 दिवसाच्या ठेवींवर 10 टक्के व्याजदर
एल के पी मल्टिस्टेट बँकेने शुभारंभ ठेव योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या ठेवींवर 10 टक्के व्याजदर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
12 टक्के वार्षिक व्याजदर
दरम्यान एल के पी मल्टिस्टेट येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
दाम चौपट ठेव योजना
आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनीय योजना एल के पी मल्टिस्टेट बँकेने सुरू केल्या आहेत. यामध्ये एल के पी दाम चौपट ठेव योजना, एल के पी दाम तिप्पट ठेव योजना, एल के पी दाम दीडपट ठेव योजना व एल के पी दाम दुप्पट ठेव योजना नागरिकांना फायदेशीर आशा चार योजना सुरू केल्या आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 24 महिन्याच्या पुढे 13 टक्के व्याजदर राहील.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना, एल के पी कन्यादान ठेव योजना, एल के पी पेन्शन योजना व शेतकऱ्यांसाठी खास एल.के.पी मल्टीस्टेट मध्ये दुधाचे पेमेंट जमा करा व त्यावर कर्ज मिळवा अशी योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, बचत खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, बचत खात्यावर ५ % वार्षिक व्याज, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,
● सेविंग्स् , करंट व पिग्मी खाते व आमचे सभासद व्हा व २ लाखांचा अपघाती विमा मोफत मिळावा अशी योजना सुरू आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज