मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्हयातील अवैध धंद्यांविरुद्ध आता थेट ‘आरपारची लढाई’ सुरू झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी कंबर कसली असून, त्यांच्या विशेष पथकामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक म्हणजे, या पथकाची कारवाई इतकी गुप्त असते की स्थानिक पोलिसांनाही त्याचा पत्ता लागत नाही.
सोलापूर ग्रामीणमधील ऑर्केस्ट्रा बारमधील अवैध प्रकाराबद्दल राज्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. त्यात स्थानिक पोलिसांवरच संशय व्यक्त करण्यात आला होता. असे प्रश्न आगामी काळात उपस्थित करायला लागू नयेत, यासाठी पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक ग्रामीणमधील अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून असणार आहे.

पोलिस अधीक्षक किंवा अपर पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हे विशेष पथक थेट त्या ठिकाणी जाऊन कारवाई करेल.
सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक, जुगार अड्डे, ओला सुका मावा, ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नृत्य व पैशांची उधळण, वेश्या व्यवसाय, अवैध मद्यनिर्मिती व विक्री, असे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालतात. त्यावर अनेकदा लोकप्रतिनिधी आवाज उठवितात आणि स्थानिक पोलिसही कारवाई करतात.

तरीपण, अवैध व्यवसाय पूर्णतः बंद झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आता पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकांकडून अशा अवैध व्यवसायांवर कारवाई केली जाणार आहे.
पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यातील अनेकजण थेट अवैध व्यवसायांची माहिती देतात. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथक त्याठिकाणी छापे टाकून कारवाई करते.

विशेष पथकातील अधिकारी, अंमलदार नेहमीच वेगवेगळे असतात, प्रत्येकवेळी तेच ते अधिकारी, अंमलदार नसतात हे विशेष पथकाचे वैशिष्ट्य आहे.
या पथकात स्थानिक गुन्हे शाखा, कंट्रोल रुम, मुख्यालयातील अधिकारी, अंमलदार असतात. विशेष पथकाने यापूर्वी अनेकदा स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय थेट त्या ठिकाणी कारवाया केल्या आहेत.

यापुढे देखील विशेष पथक कारवाई करेल, नागरिकांनी त्यांच्या तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती थेट आम्हाला द्यावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पथकातील अधिकारी, अंमलदार नेहमीच वेगवेगळे
पोलिस अधीक्षक किंवा मला मिळालेल्या गोपनीय माहितीची शहानिशा करून विशेष पथकाद्वारे त्याठिकाणी तातडीने कारवाई केली जाते. या पथकातील अधिकारी, अंमलदारांची नेहमीच अदलाबदल केली जाते.- प्रीतम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर

पथकाची रचना अन् कार्यवाही कशी?
सोलापूर ग्रामीणमध्ये २५ पोलिस ठाणे आहेत. साधारणच पावणेपाच हजार मनुष्यबळ तेथे कार्यरत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे, व्यवसायांवर लक्ष ठेवून असतात, कारवाई देखील केली जाते.
तरीपण, अनेकदा अवैध व्यावसायिकांची किंवा अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांना मिळते. त्यावेळी विशेष पथक तयार करुन त्याठिकाणी छापेमारी केली जाते. अनेकदा स्थानिक पोलिसांना देखील त्याची खबर केली जात नाही.
या विशेष पथकात गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार अधिकारी व अंमलदार दिले जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार थेट त्याठिकाणी कारवाई केली जाते. हे पथक कारवाईचे रिपोर्टिंग थेट पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांना करते.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















