mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! रस्ते अपघातात जीव वाचणार; सरकार 1.5 लाखांपर्यंतचा इलाज मोफत करणार; असा होईल फायदा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2024
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

देशात रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावरील अपघातात अनेक जण वेळीच उपचार न मिळाल्याने बळी जातात. काही जण गंभीर जखमी होतात. त्यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांच्या अनेक समस्या टळू शकतात.

पण कायदेशीर अडचणीमुळे अनेक जण मदतीला धजावत नाहीत. केंद्र सरकारने नेमकी हीच बाब लक्षात घेत त्यावर मात करण्याचे ठरवले आहे. रुग्णालयात येणारा खर्च आता केंद्र सरकार करणार आहे.

रस्ते अपघातात गंभीर जखमींसाठी केंद्र सरकार आता 1.5 लाख रुपयांपर्यंतचा इलाज करणार आहे. जखमींना कॅशलेस उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. काय आहे पथदर्शी प्रकल्प, काय होणार त्यामुळे फायदा.

पायलट प्रकल्प

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे. त्यातंर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

त्यातंर्गत जखमींवर दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार संबंधित रुग्णालयात करण्यात येतील. सध्या देशातील काही भागात हा पथदर्शी प्रकल्प सुरु आहे. लवकरच तो देशात लागू करण्यात येणार आहे.

असा होईल फायदा

जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारे मोटर वाहन अपघातात जखमी होईल. तर त्याला कोणीही जवळच्या रुग्णालयात दाखल करेल. या प्रकल्पातंर्गत त्या व्यक्तीवर उपचारासाठी 1.5 लाख पर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतील. हे उपचार कॅशलेस असेल.

या योजनेतंर्गत व्यक्तीला 7 दिवसांपर्यंत उपचार घेता येतील. त्यासाठी मोठ-मोठ्या रुग्णालयाशी टायअप करण्यात येणार आहे.

या योजनेतंर्गत कॅशलेस उपचारासाठीची दीड लाखांची रक्कम केंद्र सरकार थेट संबंधित रुग्णालयाला देईल. त्यासाठी अशा प्रकरणात संबंधित रुग्णालयाला रीइंबर्समेंट बिल सादर करावे लागेल. सध्या ही योजना चंदीगडसह देशातील काही भागात प्रायोगित तत्वावर सुरु आहे. ही योजना लवकरच संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.

सरकारकडे कोठून येणार पैसा ?

या योजनेसाठी सरकारकडे कोठून पैसा येणार असा सवाल अनेकांना पडला आहे. त्यासाठी सरकारने Motor Vehicle Accident Fund-वाहन अपघात निधी तयार केला आहे. या फंडातून जखमींच्या उपचारांसाठी रक्कम अदा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्रशासन ही योजना देशभरात लागू करण्यासाठी योजना आखत आहे. त्यावर काम करत आहे. देशातील काही भागात पायलट प्रोजेक्ट सुरु असून त्यातील अनुभवावरुन बरेच बदल करण्यात येत आहे. या योजनेत पोलिस, रुग्णालय, राज्याची आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर एक कक्ष यांच्यात समन्वय घडून आणण्यात येत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघातात मदत

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठं विधान केलं.., वाचा नेमकं काय म्हणाले

January 1, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ‘एवढे’ टक्के सवलत; नव्याने शासन निर्णय जारी

January 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

10वी, 12 वी परीक्षेच्या 1 महिनाआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या..

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

थर्टी फर्स्टला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची निघोज गावच्या महिला गाढवावरून काढणार धिंड; संपूर्ण दारूबंदीसाठी धाडसी निर्णय

December 31, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं; योजनेबाबत मोठी अपडेट

December 30, 2025
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

महिलांनो सावधान! बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने पळविले; सततच्या चोऱ्यामुळे प्रवाशांचा जीव लागला टांगणीला

December 29, 2025
Next Post
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

शिक्षकांनो! इलेक्शन ड्युटीवर नाही आल्यास होणार 'ही' कारवाई; निवडणूक आयोगाची हायकोर्टात ठाम भूमिका

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 4, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा