टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपुरातील लिंक रोड वर असलेल्या हॉटेल चतुर्थी व हॉटेल शौर्य मध्ये आज व उद्या लाईव्ह म्युझिक शो सोबत नवीन वर्षाचे स्वागत करता येणार आहे.
हॉटेल चतुर्थी मध्ये शुद्ध शाकाहारी व हॉटेल शौर्य मध्ये नॉनव्हेज चे जेवण सोबत लाइव्ह म्युझीक शो एन्जॉय करता येणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापुरात, विकास कामांची करणार पाहाणी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, ३१ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ७ वाजता संभाजी नगर येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
रविवारी दिवसभर सोलापूर शहर व ग्रामीण परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सायंकाळी साडे सहा दरम्यान ते शासकीय वाहनाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.
सकाळी ९.३० दरम्यान पालकमंत्री पंढरपूर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री हरिहर शिव महापुराण कथा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर, ११.३० वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १ दरम्यान जिल्हा नियोजन समिती निधीतून कासेगाव येथे केलेल्या वनविभागाच्या विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात डीपीसी निधीतून केलेल्या विविध कामांची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील मौजे दमाजी नगर येथील विविध कामांची पाहणी करणार आहेत. पावणे पाच दरम्यान पालकमंत्री सोलापूरकडे रवाना होणार आहेत. साडे पाच दरम्यान विजापूर रोड येथील आयोजित लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर साडे सहा दरम्यान कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज