टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि.1 डिसेंबर 2020 रोजी असून निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी
आज रविवार दि. 29 नोव्हेंबर 2020 च्या सायंकाळी 5 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कालावधीत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये मद्यविक्री बंदी म्हणजेच कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.
नियम 1969 मधील 9 (ए) (2) (सी) (1) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलडब्ल्यू-2, ई-2, एफएलबीआर-2, सीएल-2, सीएल-3 आदी सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या (दारूविक्री दुकाने) पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा ‘मंगळवेढा टाईम्स’ला 997076 6262 वर sms करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज