![]() |
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांनी एका कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते, असे वक्तव्य केले होते. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.
दरम्यान, इंदुरीकर महारांजावर या वक्तव्यामुळे पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.
या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे. मात्र याबाबत इंदुरीकरांच्यावतीने याला अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज