टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात शिर्के हॉस्पिटल समोर धर्मगाव रोड येथे सुरू झालेल्या ‘मंगळवेढा सिटी स्कॅन’ सेंटरमध्ये नागरिकांना अत्यंत माफक दरात सर्व प्रकारचे स्कॅन काढून मिळणार असल्याची माहिती संचालक डॉ.संजय देशमुख यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरात प्रथमच ‘सिटी स्कॅन’ सुरू झाल्याने नागरिकांना पंढरपूर, सोलापूरला जायची आवश्यक आता भासणार नाही इतरत्र जाणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, रुग्णांना कोरोनाचा संसर्ग फुप्फुसात किती झाला आहे, हे पाहण्यासाठी छातीचे सिटी स्कॅन केले जाते. त्यासाठी शहरात सिटी स्कॅन केंद्र कार्यान्वित झाले आहे.
मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते. सीटी स्कॅन ही प्रणाली येण्यापूर्वी लक्षणांवरून केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमका आजार कोणता आहे, याचे निदान होत असे. सीटी स्कॅन तंत्रप्रणालीमुळे मात्र आता शरीरातील प्रत्येक अवयवाचे अंतर्परीक्षण करणे सोपे झाल्याने आजारांचे निदान वेळेत करणे शक्य झाले आहे.
सीटी स्कॅन किंवा मॅग्नेटिक रिझोन्स इमेजिंग (एमआरआय) या दोन्ही तंत्रप्रणालीचे बाह्य़स्वरूप आणि त्यातून मिळणारी छायाचित्रे यामध्ये साम्य असले तरी या दोन्ही तंत्रप्रणाली भिन्न आहेत. सीटी स्कॅनमध्ये मेंदूच्या प्रत्येक भागात क्ष-किरण सोडले जाऊन मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो.
सीटी स्कॅन ही स्वस्त आणि जलद प्रणाली आहे. मेंदूच्या सीटी स्कॅनसाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर असली तरी सीटी स्कॅन करणे शक्य आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या वेळेस डोक्याची दुखापत किंवा आकडी, मेंदूला रक्तप्रवाह न होणे, ब्रेन हॅमरेज अशा स्थितीमध्ये त्वरित सीटी स्कॅनची तपासणी करून पुढील उपचार केले जातात.
शरीरातील ‘या’ अवयवचा होतो सीटी स्कॅन
कोरोनासाठी लागणारी फुफुसाचे सिटी स्कॅन (HRCT) तपासणी याचबरोबर मेंदूसाठी (CT Brain) , छातीसाठी ( CT Chest), पोटासाठी ( CT Abdomen) , शरीरातील मांस पेशींसाठी ( Soft Tissue CT) ,मानेसाठी ( CT Neck) ,मणक्यांसाठी (CT Spine), मेंदूचे हाड (Temporal Bone) ,डोके, मेंदू, नाकाभोवतीचा भाग, श्रवणेंद्रिय असलेली हाडे, मान, सर्व सांधे, सर्व टोकाचे भाग (एक्सट्रीमिटीग), फुप्फुसाची अँजिओग्राफी त्याचबरोबर सर्व स्कॅन थ्री-डी मध्ये उपलब्ध सेवा आहेत.
नागरिकांसाठी व रुग्णांसाठी हेल्पलाईन नंबर
सिटी स्कॅन संदर्भात रुग्णांनी अथवा नागरिकांनी मदतीसाठी 76 20 23 85 68 या हेल्पलाईन क्रमाकांशी संपर्क साधावा.
‘हे आहे संचालक मंडळ
डॉ.संजय देशमुख, डॉ.एम.एस. कुंभारे,डॉ. सुरेश काटकर, डॉ.एल.व्ही.मर्दा, डॉ. शरद शिर्के,डॉ.ए.ए. मुलाणी, सौ.डॉ. आर.ए. मुलाणी, डॉ.विवेक निकम,डॉ. अतुल निकम,डॉ.संदेश पडवळ, डॉ.एम.पी.महाजन, डॉ.बी.के.पडवळे,डॉ.व्ही.एस.धायगोंडे, डॉ.सौ.मंजुषा देशमुख.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज