मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शेतजमीन, घर, प्लॉट व इतर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारासंबंधी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गुरूवारी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे आज शुक्रवार दि. ८ मे पासून खरेदी विक्री व्यवहार नोंदविण्याची कार्यालये सुरू होणार आहेत.
कोरोनााच्या साथीचा संसर्ग सुरू झाल्यावर १३ मार्चपासून जिल्ह्यातील दुय्यम नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली होती. मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी व व्यवहारासाठी दस्तऐवजावर घेण्यात येणाऱ्या ठशांमुळे कोरोनाा विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका मोठा असल्याने ही कार्यालये तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहारातून शासनाला मोठा महसूल मिळतो. तसेच ही कार्यालये बंद झाल्याने अनेकांचे खरेदी विक्री व्यवहार थांबले होते. कार्यालयातील कर्मचारी व खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या लोकांमध्ये फिजीकल डिस्टन्स, मास्क आणि ठसे नोंदविताना काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कार्यालयात हात धुणे व सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू
सोलापूर जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.या आदेशाने आता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होणार असून शासनाला महसूल मिळण्यास सुरवात होणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांत जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंद असलेले हे व्यवहार सुरू व्यवहार आता सुरू होणार आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी व नागरिक यांच्यात सुरक्षित अंतर असेल याची काळजी घेण्याची करण्याचे सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे दरमहा २५ ते ३० कोटी रुपयांचा मुद्रांक शल्क जमा होतो . एप्रिलचा संपूर्ण महिना , मार्चचे काही दिवस व मे महिन्यातील सात दिवस खरेदी – विक्री व्यवहार बंद असल्याने शासनाला मिळणारा महसूल ठप्प झाला होता.
———————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज