टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील एम.आय.डी.सी.मध्ये आर.पी.आय.(आठवले गट)चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे (वय 55 रा.मोडनिंब) यांनी अज्ञात कारणावरून पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.दरम्यान,पोलिसांनी आकस्मात मयत अशी या घटनेची नोंद केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत कुमार वाघमारे हे मुळचे राहणार मोडनिंब येथील असून त्यांचा मंगळवेढा येथील एम.आय.डी.सी.मध्ये श्री तुळजाभवानी मागासवर्गीय संस्था असून त्याचे ते चेअरमन आहेत.
या कारखान्यात पुट्टे व बॉक्स तयार केले जातात.यातील मयत हे दि.15 सप्टेंबर रोजी रात्री कंपनीच्या कामासाठी जातो असे कुटुंबियांना सांगून ते बाहेर पडले.यावेळी स्वतःचा मोबाईल त्यांनी घरामध्ये ठेवून दुसरा मोबाईल सोबत नेला होता.
दि.16 पासून त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने संपर्क होवू शकला नाही. मुलगा व मित्र यांनी मंगळवेढा येथे येवून तुळजाभवानी मागासवर्गीय कंपनीच्या कार्यालयात शोध घेतला असता त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केल्यानंतर कुमार वाघमारे यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत दिसून आला.
मृतदेहा शेजारी रॉकेलचा डबा व काडेपेटी पोलिसांना मिळून आली.तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी शोध घेतला असता त्यांना एका ठिकाणी टाइप केलेला अर्ज मिळून आला.यामध्ये पाच व्यक्ती त्रास देत असून मला कंटाळा आला आहे. असे नमूद करण्यात आले होते.
हा अर्ज टेंभूर्णी पोलिस स्टेशनच्या नावे लिखीत स्वरूपा असून त्याची पोहोच मात्र पोलिसांना मिळू शकली नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची खबर मयताचा मुलगा वैभव वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे हे स्वतः करीत आहेत.
Former district president of RPI kumar waghmare commits suicide by setting himself on fire for unknown reasons
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज