टीम मंगळवेढा टाईम्स।
कृष्णा महिला पतसंस्थेमुळे दक्षिण भागाचा येणाऱ्या काळात कायापालट होणार असल्याचे गौरुउद्गार भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी काढले आहे. ते लवंगी येथे पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सरपंच अलकाताई देवकर, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन ज्योती भगत व शारदादेवी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मंगलताई पाटील आदीजन उपस्थित होते.
या संस्थेमुळे लवंगी परिसरातील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायिकांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध होणारा असून ठेवीच्या देखील अत्यंत आकर्षक योजना या संस्थेकडे उपलब्ध आहेत.
कन्यादान योजना ,कृष्णा पेन्शन योजना अशा कितीतरी बचतीच्या योजना या संस्थेने सुरू केलेल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी विविध प्रकारच्या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संस्थापक जगन्नाथ भगत यांनी केले.
यावेळी सांगोला येथील किशोर केदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी शिवकालीन मर्दानी खेळाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले.
दांडपट्टा ,तलवारबाजी , ढाल तलवार , लाठी फिरवणे , मशाल लाठी इत्यादी एकापेक्षा एक अंगावर शहारे आणणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळांच्या कसरती दाखवण्यात उपस्थित समुदायांची मने जिंकली.
याप्रसंगी लवंगीचे उपसरपंच डॉ.कृष्णात माने, सूर्योदय परिवाराचे सहसंस्थापक सुभाष दिघे गुरुजी, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे ,ज्येष्ठ नेते शशिकांत निकम, कृष्णा निकम, भारत निकम, प्रा.शिवाजीराव जाधव, देवकर गुरुजी, प्रकाश पाटील, लखन माने, तानाजीराव पवार सर,
सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल काळुंगे, पाठखळचे माजी सरपंच ऋतुराज बिले, उटगीचे ज्येष्ठ नेते भाऊराया पाटील, विष्णूबापू चव्हाण, इंगोले सर, चव्हाण गुरुज, गणपत निकम, नालसो मुजावर, सिद्धराया होनमाने,
योगेश बनसोडे यांच्यासह लवंगी आणि पंचक्रोशीतील नागरिक खूप मोठ्या संस्थेने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीनाथ निकम, डॉ. प्रथमेश पाटील, संस्थेचे मॅनेजर अशोक जाधव यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज