मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कृषीभूषण अंकुश पडवळे व सुयश यशवंत चौगुले यांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोटरसायकल वरून जात असताना शेतातील रस्त्याच्या भांडणाच्या कारणावरून खुपसंगी येथील अंकुश पडवळे यांच्यासह सात जणांनी लोखंडी गज व तलवारीने जीवे मारण्याचा हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी बापू बाबासो शेळके (रा.खुपसंगी) यांनी फिर्याद दिली होती अंकुश उर्फ तुकाराम पडवळे, संजय शंकर दवले, श्रीकांत सुभाष दवले, संग्राम सिताराम पडवळे, लक्ष्मीकांत दत्तात्रय दवले, इंद्रजित शंकर दवले, सुयश यशवंत चौगुले, व इतर तीन असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीसह अन्य नातेवाईक 13 जून रोजी मोटारसायकलवर खुपसंगी कडे जात असताना रात्री 12/40 वा चे सुमारास युटोपियन कारखाना कचरेवाडी रस्त्यावर
अंकुश उर्फ तुकाराम पडवळे, संजय शंकर दवले, श्रीकांत सुभाष दवले, संग्राम सिताराम पडवळे, लक्ष्मीकांत दत्तात्रय दवले, इंद्रजित शंकर दवले, सुयश यशवंत चौगुले, व इतर तीन जणांनी
तुम्ही का भांडणे केली तु रस्ता कसा काय बंद करतो असे म्हणुन अंकुश उर्फ तुकाराम पडवळे याने त्यांचे हातातील लोखंडी रॉडने बापू शेळके यांच्या पाटीत व डावी बाजुच्या बरगडीवर मारून गंभीर जखमी करून
बरगडी फॅक्चर केले होते. तसेच श्रिकांत दवले यांनी सुध्दा लोखडी रॉडने व काठीने मारहाण केली तसेच संग्राम सिताराम पडवळे, लक्ष्मीकांत दत्तात्रय दवले सुयश यशवंत चौगुले यांनीही फिर्यादीस हाताने लाथाबुक्यांने मारहाण करून
शिवीगाळ दमदाटी केली होती. तसेच इंद्रजित शंकर दवले यांनी हातात दगड घेवुन मला दगडानी मारहाण केली त्यावेळी श्रीकांत दवले यांनी हातात तलवार घेवुन जिवे मारण्याची धमकी देत तलवारीचा वार केला
तो फिर्यादीने चुकविला व त्यावेळी फिर्यादीचा भाऊ भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही इंद्रजित शंकर दवले यांनी काठीने मारहाण केली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज