मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोव्हिकोट हे नवीन तंत्र सध्या वापरले जात आहे. यामुळे कोरोना विषाणूपासून सुमारे ९० दिवसांपर्यंत बचाव होऊ शकतो. Kovikot gives 90 days protection
या विषाणू प्रतिबंधक तंत्राचा राष्ट्रपती भवन , विविध मंदिरांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही वापर केला जात आहे. कोव्हिकोटच्या वापरामुळे मोबाइल फोन , लॅपटॉप , गाडी , कार्यालयाची जागा , लिफ्ट आदी गोष्टी कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहू शकतात.
या तंत्रामध्ये एखाद्या परिसरात किंवा पृष्ठभागावर विषाणू प्रतिबंधक द्रव्याचा फवारा केला जातो . दोन मिनिटे ते द्रव्य तसेच राहू दिले जाते. फवारणी केल्यावर कोव्हिकोटच्या द्रव्याचा माइक्रॉनचा थर जमा होतो. त्यामुळे त्या भागात चक्क ९० दिवसांपर्यंत कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण मिळू शकते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज