टीम मंगळवेढा टाइम्स ।
यंदा प्रदर्शित होणा-या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचे नाव काय तर ‘केजीएफ 2’. अशात सिनेमाचा टीजर आणि ट्रेलरचीही प्रतीक्षा होणार.
खरे तर अभिनेता यशच्या वाढदिवशी म्हणजे आज 8 जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात ‘केजीएफ 2’चा टीजर रिलीज होणार होता. पण झाला एकदिवस आधीच.
कारण काय तर ऑफिशिअल रिलीजआधीच हा टीजर लीक झाला होता. त्यामुळे घाईघाईत आणि वेळेआधी मेकर्सलाऑफिशिअल टीजर प्रदर्शित करावा लागला.
यश आणि संजय दत्त दोघांनीही नव्या पोस्टरसह ‘केजीएफ 2’चा टीजर शेअर केला. यशने सोबत एक व्हिडीओ शेअर करत, टीजर लीक झाल्याची माहिती दिली. ‘काही महान आत्म्यांनी टीजर लीक केला होता. याचे कारण काय, मला माहित नाही.
पण मी यामुळे जराही विचलित झालेलो नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो,’ असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. आम्ही धुमधडाक्यात टीजर रिलीज करणार होतो. पण प्लान फसला, असे म्हणत यशने चाहत्यांची माफीही मागितली आहे.
KGF Chapter 2 Teaser out now..
Here, https://t.co/iSf1m4Tjwc pic.twitter.com/Jefpocqez5— Yash (@TheNameIsYash) January 7, 2021
आता जरा टीजरबद्दल बोलूयात, तर टीजरची सुरुवात होते यश अर्थात रॉकीच्या बालपणाने. रॉकीची आई आणि त्याच्या बालपणीची झलक सुरुवातीला दिसते. रॉकीच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला, हे सुरुवातीला दिसते.
या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडनचीही झलक पाहायला मिळते. ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत दिसते. संजय दत्तचा जबरदस्त अवतार टीजरमध्ये दिसतो. सुपरस्टार यशही दमदार स्टाईलमध्ये दिसतो.
केजीएफ- चॅप्टर 1′ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘केजीएफ -1’ ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे ‘केजीएफ 2’ ची कथा सुरु होत आहे.
या सिक्वलमध्ये यशशिवाय संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज