मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
केळगाव (ता.केज) येथील आश्रमशाळेवर १८ वर्षांपासून विनावेतन नोकरी करणाऱ्या शिक्षकाने शनिवारी पहाटे बीड शहरातील स्वराज्यनगर भागात शिक्षण संस्थाचालकाच्या पतसंस्थेसमोर गळफास घेत आत्महत्या केली.
त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर अनेक पोस्ट केल्या. शेवटच्या पोस्टमध्ये त्यांनी संस्थाचालकावर छळाचे आरोप करत त्यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले.
तर आपल्या ३ वर्षीय मुलीला उद्देशून लिहिले की, श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून धनंजय नागरगोजे दूर जात आहे. धनंजय अभिमान नागरगोजे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे अठरा वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. ही आश्रमशाळा विक्रम मुंडे चालवतात. शाळा विनाअनुदानित असल्याने त्यांना पगार मिळत नव्हता.
मात्र भविष्यात अनुदान मिळेल या आशेवर ते काम करत होते. सन २०१९ मध्ये शासनाने २० टक्के अनुदानाची घोषणा केली होती. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. नागरगोजे यांनी संस्थाचालक विक्रम मुंडे यांच्याकडे १८ वर्षांपासून पगार दिला जात नसल्याबाबत विचारणा केली होती.
या कारणावरून संस्थाचालक व त्यांच्या लोकांकडून छळ केला जात असल्याचे नागरगोजे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी नागरगोजे घराबाहेर पडले होते. त्यांनी फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याचे पोस्ट केले.
शनिवारी पहाटे त्यांचा मृतदेह बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील कृष्णा अर्बन पतसंस्थेसमोर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही पतसंस्था विक्रम यांचे चिरंजीव विजयकांत मुंडे यांची आहे.
पोलिसांत तक्रारच नाही
शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. उत्तरीय तपासणी केली.
मात्र या प्रकरणात नागरगोजे कुटुंबीयांनी कुणाविरोधातही तक्रार न दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत धनंजय यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.(स्रोत;दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज