
टीम मंगळवेढा टाईम्स । माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात अण्णामलाई कुप्पुसामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पी मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
कर्नाटकचे ‘सिंघम’ म्हणून ओळख
माजी आयपीएस अन्नामलाई कुप्पुसामी हे कर्नाटकातील ‘सिंघम’ म्हणून लोकप्रिय आहेत. भाजपने ट्विट केले आहे की, “माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी पी मुरलीधर राव आणि एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
अन्नामलाई कुप्पुसामी एक प्रामाणिक, शूर आणि सुप्रसिद्ध अधिकारी मानले जातात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे जेव्हा त्यांची बदली उडुपी आणि चिक्कामगलुरू एसपी म्हणून झाली तेव्हाच स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला होता.
Karnataka’s ‘Singham’ former IPS Annamalai joins BJP



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













