mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुवर्णसंधी! पोलीस खात्यात तब्बल एवढ्या जागांसठी होणार भरती; गृहमंत्र्यांची घोषणा…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 12, 2021
in राज्य
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील तरूण डोळे लाऊन असणार्‍या पोलीस भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून याच्या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये तब्बल १२ हजार ५३८ कर्मचार्‍यांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पोलीस खात्यात मोठी भरती होणार असल्याचे सूतोवाच आधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना देशमुख यांनी याबाबत घोषणा केली.

ते म्हणाले की, पोलीस खात्यात 12 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार 300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

तसेच 12 हजार 538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.

याआधी अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार असल्याचे म्हटले होते. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा ठरणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस भरती

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

आता हे काय नवीन! हॉलमार्क ही सोने शुद्धतेची गॅरंटी नाही, ग्राहकांच्या विश्वासाला तडा; कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

November 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

हक्काचा प्लॉट घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! मंगळवेढ्यात ‘वीरश्री बँक’ देणार अवघ्या एका दिवसात कर्ज; आजच व्हा ‘शिवशाही सिटी’त स्वतःच्या प्लॉटचे मालक; 9673635511 संपर्क साधावा

November 12, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट

November 12, 2026

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
Next Post
बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 'हा' आजार अत्यंत धोकादायक

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा