टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भिमा नदीपात्रातून बैलगाडीच्या सहाय्याने 6 जणांनी वाळू चोरी केल्याप्रकरणातून मंगळवेढयाचे न्यायाधीश जी.एम.चरणकर यांनी पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.
या घटनेची हकिकत अशी, माचणूर येथील सिध्देश्वर उर्फ लाडिक डोके, भास्कर शिवशरण, महावीर डोके, संजय गायकवाड, सुनिल डोके, दिपक डोके या सहा जणांनी दि.9/11/2017 रोजी संध्याकाळी 7.00 वा. माचणूर येथील भिमा नदीपात्रातून बैलगाडीच्या सहाय्याने
अंदाजे 20.50 ब्रास वाळू चोरून नेल्याचा गुन्हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात कलम 379, 34, पर्यावरण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे दाखल होता.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून मंगळवेढा न्यायालयात आरोपीविरूध्द आरोपपत्र दाखल केले होते.
या खटला सुनावणीदरम्यान पंच म्हणून कोतवाल संजय कुरवडे, विनोद शिवशरण, मंगळवेढयाचे मंडल अधिकारी रणजित मोरे व पोलिस तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
आरोपीच्या वतीने अॅड.धनंजय हजारे यांनी साक्षीदारांच्या साक्षीत विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच यातील आरोपी हे एकाच पार्टीचे असल्याने त्यांना राजकिय व्देशातून खोटे गुंतवले आहे.वाळू चोरून नेली याबद्दलचा कुठलाही पुरावा दिला गेला नाही. असा युक्तीवाद त्यांनी मांडला.
हा युक्तीवाद ग्राह्य मानून वरील सर्व आरोपीची वाळू चोरी प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात आरोपीच्यावतीने अॅड.डी.एस.माने यांनीही काम पाहिले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज