टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक तथा मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे यांना अहमदनगर येथील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पत्रकाररत्न हा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोककलावंत पै.मजनूभाई शेख स्मृती गौरव पुरस्कार वितरण व काव्यांजली सोहळा रविवार दि.४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू तथा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.एस.एन.पठाण तर उद्घाटक म्हणून चित्रपट गीतकार,सिनेअभिनेते बाबासाहेब सौदागर हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी आयोजित केलेल्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद सेने अभिनेत्री तथा ज्येष्ठ नाट्यकर्मी वसुंधरा शर्मा या स्वीकारणार आहेत.
या पुरस्कार वितरण व काव्यांजली कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान खान पठाण,श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे,
माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी,श्रीरामपूर बस स्थानकाचे आगारप्रमुख राकेशकुमार शिवदे,जीवन गौरव मासिकाचे संपादक रामदास वाघमारे यांच्यासह श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख,
नगरसेवक मुक्तारभाई शहा,नगरसेवक राजेश अलघ, नगरसेवक दीपक चव्हाण आदींची उपस्थिती लाभणार असल्याचे संमेलनाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष तथा दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक रजाक भाई शेख यांनी सांगितले.
यावेळी जीवनगौरव पत्रकार रत्न शिक्षक रत्न समाज रत्न कलारत्न साहित्यरत्न इत्यादी पुरस्काराचे वितरण होणार आहे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कवी संमेलन ही पार पाडणार आहे.
संपादक दिगंबर भगरे यांनी सातत्याने आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून वंचित समाजासाठी व उपेक्षित वर्गासाठी काम केल्याने त्यांना अहमदनगर येथील दोस्ती फाउंडेशनोचा पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापुर्वी संपादक दिगंबर भगरे यांना मराठा सेवा संघाचा उत्कृष्ट पत्रकार,राज्यस्तरीय समृद्धी भूषण पुरस्कार,शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार,साप्ताहिक रणयुग टाईम्सचा गुरू द्रोणाचार्य पुरस्कार याचबरोबर इंडस हेल्थ प्लसच्या वतीने बॅकाॅक, थायलंड येथे विशेष सन्मान,पाणी फौंडेशनच्या वतीने विशेष सन्मान,नटराज अॅकॅडमी सोलापूरच्या वतीने विशेष सन्मान प्राप्त झाला आहे.
दिगंबर भगरे यांनी १९९७ सालापासून साप्ताहिक मंगुडं या साप्ताहिकातून आपल्या पत्रकारीतेची सुरवात केली.त्यानंतर १९९९ साली त्यांनी साप्ताहिक मंगळवेढा शहर या नावाने वृत्तपत्र चालू करून २००० साली मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची स्थापना,
२००४ साली साप्ताहिक पंतनगरी नावाचे वृत्तपत्र,२००६ साली साप्ताहिक छावा हे वृत्तपत्र,२०१० साली दै.दामाजी एक्सप्रेसची दमदार सुरवात,२०११ साली दैनिक स्वाभिमानी छावा वृत्तपत्र,२०१२ साली शहर एंटरटेनमेंटची स्थापना,
२०१२ साली गावाकडची पोरं या प्रथम लघूचित्रपटाची निर्मिती,२०१५ साली इस्कुट लघूचित्रपटाची निर्मिती,२०१६ साली मंगळवेढा येथे सुरसंगम म्युझिकल ग्रुपची स्थापना,२०१७ साली साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संटनेची स्थापना,२०१७ साली दामाजी प्रिमीयर लिग ची स्थापना,२०१८ साली नि:शब्द लघुचित्रपटाची निर्मिती,२०१९ ला राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाचे आयोजन,२०१९ ला भुमी संतांची व पाऊलखुणा लघुचित्रपटाची निर्मिती,२०१९ ला
अक्षरगंध साहित्य संघाची स्थापना,२०२० रोजी पदवीधर पत्रकार संघाची स्थापना तसेच २०२० साली लव्ह लेटर लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे.
त्याचबरोबर दिगंबर भगरे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरचे संचालक,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मंगळवेढाचे संचालक,प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढ्याचे संचालक,लायन्स क्लब मंगळवेढ्याचे माजी अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ पतसंस्था मंगळवेढ्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
वरील गोष्टींचा लेखाजोखा घेऊन त्यांना आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज