टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ११९ तर सदस्य पदासाठी ६२५ असे विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेच्यावतीने उमाकांत मोरे यांनी दिली.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ऑनलाइन अर्जातील तांत्रिक अडचण लक्षात घेऊन, ऑफलाइन अर्जाचा देखील पर्याय निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिला.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी ६४ व सदस्यपदासाठी ही ३२६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सरपंचपदासाठी सर्वाधिक अर्ज पाटकळमधून १३ अर्ज तर सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज तळसंगी येथून ५४ जणांनी अर्ज भरले.
चार जागा बिनरोध निघण्याचा मार्ग मोकळा
हाजापूर या ग्रामपंचायतीत शांताबाई रजपूत, लक्ष्मी करांडे, रवींद्र जानकर कांताबाई साखरे चार जागा बिनरोध निघण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्यामध्ये सरपंचपदाचे आरक्षण राखीव असलेल्या जागेसाठी गाव पातळीवरील नेत्यांना त्या प्रवर्गातील उमेदवारी शोधताना नाकीनऊ आले.
तर काही उमेदवारांनी खर्चाची बाजू व गाव पातळीवरील कल पाहून संभाव्य विजयी गटाची उमेदवारी घेतली.
दाखल झालेल्या अर्जांचा तपशील याप्रमाणे (कंसाच्या बाहेरील आकडे हे सरपंचपदाच्या अर्जाचे तर कंसातील आकडे हे सदस्यपदासाठीचे) खोमनाळ ६ (३५), भालेवाडी ५ (३१), पौट ६ (३१), बावची १० (२४), गुंजेगाव ५ (३४), ढवळस ९ (३७),
शिरनांदगी ६ (४०), मारोळी ८ (३२), रहाटेवाडी ३ (२७), डोंगरगाव ८ (५२), हाजापूर ३ (१०), गोणेवाडी ६ (३८), येड्राव ९ (३९), मारापूर ७ (४१ ), सोड्डी ५ ( २८ ), तळसंगी ५ (५४), पाटकळ १३ (४९), फटेवाडी ५ (२३).
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज