टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुलीशी भांडण का केले म्हणून संतापलेल्या सासू , सासऱ्यांनी जावयाला पट्टयाने मारहाण केली. त्यानंतर त्यास दुचाकीवर बसवून नेले व त्यांच्या घरी ८ दिवस डांबून ठेवले.
ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेगाव, ता.सांगोला येथे घडली. याबाबत जितेंद्र मवाली शिंदे (रा.आलेगाव) याने सासू , सासरे , मेहुण्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
आलेगाव येथील जितेंद्र मवाली शिंदे याचे दुपारी २ वाजेच्या सुमारास पत्नी मनीषा हिच्यासमवेत मुलाला घेरडी येथे शाळेत घालण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते.
त्याचा राग मनात धरून पत्नी मनीषा अरबळी (ता . मोहोळ) येथे तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मेहुणा व सासऱ्याने फोन करून त्यास कशाला भांडण केले,
तुम्ही इकडे या आपण भांडण मिटवू, असे म्हणाले ; परंतु कामामुळे तो गेला नाही. त्यानंतर २३ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो घरी असताना
सासरे समाधान काळे, मेहुणे अमोल काळे, अभिमान काळे, राहुल काळे व सासू पारूबाई काळे, जितेंद्र शिंदे याच्या घरी आले.
सासरे समाधान काळे याने तू माझ्या मुलीसोबत भांडण करून मारहाण का केली. मेहुणा अमोल काळे व अभिमान काळे याने तलवारी पट्ट्याने त्याला मारहाण केली.
आमच्याकडे चल तिथे काय असेल ते मिटवू असे म्हणून त्याला अरबळी येथे नेऊन तेथेच ८ दिवस घरी डांबून ठेवल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज