मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील वयोवृद्ध महिलेचा अंतविधी उरकून परत येत असताना दुचाकीला जेसीबीची धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना सलगर बुद्रुक ते लवंगी रस्त्यावर सुतारवाडी जवळ घडली.
लवंगी येथील एका वृद्ध महिलेचे निधन झाल्याने कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडक लोकांच्या उपस्थितीत अंतविधी उरकण्यात आला.
बावची येथील नातेवाईक अंतविधीनंतर गावाकडे येत असताना वाटेत जेसीबी मागे घेताना मागील बाजूस धडक बसली. त्यात येळगी येथील दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर हरीबा बंडगर व सोन्या कोकरे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
—————-
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज