टीम मंगळवेढा टाईम्स।
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी देखील महायुतीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये
भाजपने दुसरी यादी जाहीर केली अन् राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले. तर येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीकडून देखील पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे.
एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापूरात सावध खेळी केल्याचं पहायला मिळतंय. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते या युवा तरुण आमदाराला जागा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता नव्या नावाचा खुलासा झाला आहे.
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मिलिंद कांबळे हे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुकणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय.
सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असं स्वत: प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. अशातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध मिलिंद कांबळे यांच्यात थेट मुकबला होणार हे जवळजवळ निश्चित झालंय.
कोण आहेत मिलिंद कांबळे ?
मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित चेहरा भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज