टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मरवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह 5 सदस्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपात्र
केलेल्या आदेशाला राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी स्थगिती दिली त्यामुळे या पाच सदस्यांना सरपंचाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
दरम्यान, अपात्र सदस्यांना निवडणूक आयोगाने पात्र केल्यामुळे आज होणारी सरपंच पदाची निवड तहकूब होणार असल्याचे समजते. पात्र झालेल्या सदस्यांना नोटिसा न गेल्यामुळे आजची निवड तहकूब होण्याची शक्यता आहे.
वर्षा पूर्वी झालेल्या मरवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निवडणूक निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या
बँक खात्यावरुन निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले असून यात सरपंच,उपसरपंच अन्य 3 सदस्यांनी विहीत नमुन्यात खर्च सादर केला नसल्याची बालाजी पवार यांनी दाखल केली.
सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी 7 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच सचिन घुले, मिनाक्षी सुर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील , दिक्षा शिवशरण या सदस्यांना आदेशाच्या दिनांकापासून अपात्र घोषित करून पुढील पाच वर्षे सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निर्बंध घातले.
या निर्णयाविरोधात या सदस्यांनी अँड आशिष गायकवाड,अॅड प्रकाश घुले यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली यावर यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे उमेदवाराने बँक खाते स्वतंत्र उघडले होते.
परंतु कोरोना कालावधी असल्यामुळे त्याचे आर्थिक व्यवहार बँक खात्यावरून करता आले नाही शिवाय निवडणुकीचा खर्च वेळेत दिला असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्यांचा आदेश आदेशाला स्थगिती दिली.
दरम्यान सरपंच सचिन घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या जागी आज होणारी सरपंचाची निवडीसाठी त्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला असून सदर सरपंच निवड पुढे ढकलण्यात आल्याचे समजले याबाबत मंडळ अधिकारी चंद्रकांत घाडगे यांनी िल्हाधिकार्यांना मार्गदर्शन मागितले असून यावर सकाळी अधिकृत सांगण्यात येईल असे सांगितले.(स्रोत:सकाळ)
निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला आयोगाने योग्य न्याय दिला
स्थानिक सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून स्थापन केलेली गाव विकास आघाडी हे कुठल्याही पक्षाची संबंधित नसून एक वर्षाच्या काळात दीड कोटीची विकास कामे करून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भाजपा प्रणित स्वाभिमानी पॅनलने निवडणूक खर्चाविषयी तक्रार करून सदस्यांना अपात्र करून रडीचा डाव खेळला पण या रडीचा डाव विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला आयोगाने योग्य न्याय दिला.- दत्तात्रय गणपाटील, गावआघाडी प्रमुख
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज