मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती प्राप्त झाली आहे. देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे.
संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी थोड्या-थोड्या रकमेच्या स्वरूपात कधी १ लाख तर कधी २ लाख अशा प्रकारे ही रक्कम त्यांच्या खात्यांत वळवल्याचे समोर आले आहे.
सध्या त्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून त्यांचे नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिलाय.
या दोन्ही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू असून त्यांनी हे पैसे पुढे कोणाला दिले का? यामागे नेमकं कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी आतापर्यंत पाच बनावट ॲप्स (उदा. pujapariseva.com, navgrahmandir.com, onlineprasad.com, hariom.app, epuja.com) आणि वेबसाइट्सवर गुन्हे दाखल केले आहेत.
हे ॲप्स आणि वेबसाइट्स व्हीआयपी दर्शन, ऑनलाइन पूजा, अभिषेक आणि तेल अर्पण करण्याच्या नावाखाली देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भाविकांकडून पैसे गोळा करत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज