समाधान फुगारे । ग्राहकहितालाच सर्वप्रथम प्राधान्य देणारी सुवर्णपेढी अर्थात मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एका अभिनव योजनेचा शुभारंभ केला आहे. ग्राहकाभिमुख असलेला हा व्यवसाय आणखी एक पाऊल पुढे टाकत सोने दागिन्यांच्या खरेदीवर त्या दगिन्यांना विमा संरक्षण करून देत आहे हि सुविधा मोफत आहे.सध्याच्या असुरक्षित जीवनशैलीमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नेहमीच त्या दागिन्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. म्हणून ग्राहकहिताच्या दृष्टीने ही योजना सुरू केली आहे.
मंगळवेढा शहरातील नामांकित असलेले मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी ग्राहकांच्या हितासाठी सोने खरेदीवर मोफत विमा कवच देण्याची योजना आणली हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी काढले आहे. ते मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी आयोजित केलेल्या नवीन योजनेच्या सुभारंभा प्रसंगी बोलत होते.
स्मार्ट महाबचत योजने अंतर्गत विनामजुरीचे सोने आता ग्राहकांना खरेदीकरता येणार आहे.त्यासोबत खरेदी केलेल्या दागिन्यांचा मोफत विमा उतरवला जाणार आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे,पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक रामचंद्र कौंडुभैरी,प्रवीण खवतोडे,उद्योजक राहुल ताड, संचालक जयदीप रत्नपारखी,प्रभाकर रत्नपारखी, सौरभ रत्नपारखी,सायली रत्नपारखी आदीजन उपस्थित होते.
“हौस तुमची जबाबदारी आमची’ या मूलतत्त्वांच्या आधारावर सर्वांना सुरक्षिततेची हमी देत फ्री इन्शुरन्स या योजनेचे स्वागत केले जात आहे.
दागिने खरेदी करणे म्हणजे एक उत्तम गुंतवणूक असते. या गुंतवणुकीसोबतच येते ती दागिने संभाळण्याची जबाबदारी. परंतु मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या मोफत विमा संरक्षण योजनेमुळे आता फक्त दागिने खरेदी करायचे आणि बिनधास्त राहायचे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या शाखेला भेट देण्याचे आवाहन संचालक जयदीप रत्नपारखी यांनी केले आहे.
याप्रसंगी पहिल्या पाच ग्राहकांना उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते खरेदीकेलेल्या दागिन्यांवरील विमा पॉलिसी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले आहे.
Insurance cover on jewelry purchases; M / s Gajanan Ramchandra Ratnaparkhi Jewelers’ initiative for customers
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज