टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथे ‘खून का बदला खून’ म्हणून स्वतःच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पुतण्याचा काठीने मारून निर्घृण खून केल्याच्या आरोपातून
चुलता, चुलती व चुलत बहीण अशा तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी हा निकाल दिला.
गाजलेल्या या खून खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
नवनाथ उत्तम शिंदे (वय ४०,रा.खवे ) असे खून झालेल्या पुतण्याचे नांव आहे. या आरोपातून त्यांचा चुलता रावसाहेब शंकर शिंदे, चुलती पार्वती शिंदे व मुलगी नंदिनी शिंदे या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आंधळगाव येथील रावसाहेब शिंदे यांचा मुलगा परमेश्वर शिंदे यांचा कांही दिवसांपूर्वीच यातील नवनाथ शिंदे याने जागेच्या वादातून टॉमीने मारून खून केला होता.
त्यानंतर नवनाथ हा २०१९ मध्ये जेलमधून बाहेर आला होता. मात्र , तो आंधळगांव येथून खवे येथे राहण्यास गेला.
दरम्यान , दि. ७ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी मावसभाऊ विकास शिंदे याच्यासोबत आंधळगांव येथे मावशीला पाहण्यास आला होता.
यावेळी भरदिवसा त्याचा काठीने मारून खून करण्यात आला. स्वतःच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याबाबतची फिर्याद विकास शिंदे यांनी मंगळवेढा पोलिसांत दाखल केली होती.
त्यानुसार एका अल्पवयीन बालकासह मयत नवनाथ याचा चुलता रावसाहेब शिंदे, चुलती पार्वती शिंदे, त्यांची मुलगी नंदिनी शिंदे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
यातील पार्वती व नंदिनी यांना काही दिवसांनी जामीन मंजूर झाला होता. परंतु, रावसाहेब शिंदे गेली तीन वर्षे जेलमध्ये होता.
पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाल या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी नेत्र साक्षीदार, डॉक्टर , तपासी अधिकारी व इतर अशा १२ जणांच्या साक्षी नोंदविल्या.
यात आरोपीचे वकील अॅड.दत्तात्रय यादव यांनी केलेला युक्तीवाद व साक्षी पुराव्यातील विसंगती या कोर्टाने ग्राह्य धरत वरील तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड .दत्तात्रय यादव यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज